मुंबई : रत्नाकर मतकरी यांची ओळख द्यायची म्हणजे लेखक किंवा कथाकार अशीच दिली जाते, परंतु यामागे एक प्रदीर्घ कीर्तीचे विलक्षण व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या केवळ गूढ कथा नाहीत तर नाट्यकृती, बालनाट्ये अशा अनेक माध्यमातून साहित्यनिर्मिती झालीय. लहान मुणसाठी केवलशाहीचे निर्मितिउ नाही तर त्यांनाही नाटक देणारे म्हणून ते ओळखले जातात. आपल्या कार्याचा वास आपणच घ्यायचा असतो, हे स्मरून ३० वर्षांपर्यंत आपली पदरमोड करून त्यांनी त्यांच्याकडून नाटके करवून घेतली.
बावीस नाटके, अनेक एकांकिका, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी मतकरींचे विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन रत्नाकर मतकरींचे होते. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्व्हेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमांमधली कामेही रसिकप्रिय ठरली आहेत.
रत्नामकर मतकरींचा 'रत्नातक्षरं' हा ग्रंथ चार भागांत विभागला गेला आहे. पहिल्या विभागात एक अस्वस्थ कलावंत, एक माणूस कलावंत, मतकरी : लेखन प्रपंच या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या विभागात मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबऱ्या, लेख, कविता, प्रस्तावना, पत्रे, अर्पणपत्रिका या साहित्य-प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या विभागात मान्यवर मंडळींना मतकरी कसे वाटतात यावरील लेखनप्रपंचांचा समावेश करण्यात आला आहे. चौथ्या विभागात मतकरींच्या संपूर्ण साहित्याच्या (संग्रहित आणि असंग्रहित) आणि नाट्यप्रयोगांच्या तपशिलांची दीर्घ सूचीही दिलेली आहे.