ठाकरे गटाचे शरद कोळी यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल
17-Nov-2023
Total Views |
मुंबई : उबाठा गटाचे उपनेते शरद कोळी यांच्याविरोधात मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्र्यातील उद्धव ठाकरेंचे लावण्यात आलेले पोस्टर फाडण्यात आले होते. या दरम्यान शरद कोळी यांनी ११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला थेट इशारा देत, रात्री पोस्टर्स काढणे सुरू ठेवल्यास शिवसैनिक दिवसा प्रत्युत्तर देतील, असा इशारा एका व्हिडीओ माध्यमातून देण्यात आला होता.
या कथित धमकीला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाने निर्मल नगर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर कारवाई करत मुंबईतील निर्मल नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो सोलापूरच्या कामठी पोलिसांकडे वर्ग करण्याचे काम सुरू आहे. झोन-८ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची पुष्टी केली. दीक्षित म्हणाले की, ”हा व्हिडिओ सोलापूरमधून अपलोड करण्यात आला होता आणि या संदर्भात एका व्यक्तीने गुरुवारी निर्मल नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, या तक्रारवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु कोळी यांचा व्हिडीओ सोलापूर जिल्हयातील कामठी येथून व्हायरल झाल्यामुळे हा गुन्हा कामठी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे." अशी माहिती त्यांनी दिली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.