ठाकरे सरकारची गच्छंती ते फडणवीस-शिंदे मंत्रीमंडळ विस्तार, असा आहे घटनाक्रम!

    09-Aug-2022
Total Views |

Mah MTBमुंबई
: महाराष्ट्रात सत्तांतरानंतर आता फडणवीस-शिंदे सरकारचा शपथविधीही पार पडला. सरकार स्थापनेपासून मंत्रीमंडळ विस्ताराला तब्बल ४१ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य १८ जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.


भाजपतर्फे शपथविधी झालेले नऊ मंत्री

१) राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी (अहमदनगर), कॅबिनेट
२) सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर (चंद्रपूर), कॅबिनेट

३) चंद्रकांत पाटील – कोथरूड (पुणे), कॅबिनेट

४) डॉ. विजयकुमार गवित – नंदुरबार , कॅबिनेट

५) गिरीश महाजन – जामनेर (जळगाव), कॅबिनेट

६) सुरेश खाडे – मिरज (सांगली), कॅबिनेट

७) रवींद्र चव्हाण – डोंबिवली, कॅबिनेट

८) अतुल सावे – संभाजीनगर पूर्व, कॅबिनेट

९) मंगलप्रभात लोढा – मलबार हिल, कॅबिनेट

शिवसेनेतर्फे शपथविधी झालेले मंत्री
 
१) गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण, कॅबिनेट

२) दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक), कॅबिनेट

३) संजय राठोड – यवतमाळ दिग्रस, कॅबिनेट

४) संदिपान भुमरे – पैठण (संभाजीनगर), कॅबिनेट

५) उदय सामंत – रत्नागिरी, कॅबिनेट

६) तानाजी सावंत – पलांडा (उस्मानाबाद), कॅबिनेट

७) अब्दुल सत्तार – सिल्लोड (संभाजीनगर), कॅबिनेट

८) दीपक केसरकर – सावंतवाडी (सिंधुदुर्ग), कॅबिनेट

९) शंभूराजे देसाई – पाटण (सातारा), कॅबिनेट

 
असा होता सूरत व्हाया गुवाहाटी ते सत्तास्थापनेचा घटनाक्रम
 
२० जून रोजी शिवसेनेचे १५ आमदार आणि १० अपक्ष आमदारांसह तत्कालीन शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे सुरतला पोहोचले. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार याची जवळपास निश्चिती झाली होती. कधी नव्हे इतकं नाट्यमय वळण राज्याच्या राजकारणाला आलं होतं. सुरतनंतर आमदारांनी आपला मुक्काम गुवाहाटीला वळवला.
 
२३ जूनला शिंदेंनी दावा केला की त्यांच्याजवळ एकूण ३५ आमदारांचं समर्थन आहे. तसं पत्रच शिंदेंनी काढलं.
२५ जून रोजी तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवल्याची नोटीस बजावली होती. शिंदेंसोबत असलेले शिवसेना आमदार थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
२६ जून रोजी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, केंद्र आणि महाराष्ट्र पोलीस आणि उपाध्यक्षांना नोटीस दिली. शिंदेंसोबत असलेल्या आमदारांना दिलासा मिळाला.

२८ जून रोजी राज्यपालांनी तत्कालीन उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले. सरकार अल्पमतात असल्याचे दिसताच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी राज्यपालांकडे केली होती.

२९ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रीयेवर स्थगिती आणण्यास नकार दिला. याच वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार झाले.


३० जून रोजी एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदारांच्या गटाला मान्यता दिली. फडणवीस-शिंदे सरकारने दुसऱ्याच दिवशी मान्यता दिली.

३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी झाली.

८ ऑगस्ट रोजी होणारी पुढील सुनावणी आता १२ ऑगस्टला होणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.