सलीम-जावेद' दोघांचाही मुक्काम ऑर्थर रोड जेल!

    08-Aug-2022
Total Views | 180


raut
 
 
 
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. त्यावेळी 'सलीम तो अंदर गए है, अब जावेद भी जाएंगे' असे सूचक विधान मोहित कंबोज यांनी केले होते.
 
 
त्यात सलीम म्हणजे नवाब मलिक आणि जावेद म्हणजे संजय राऊत असे दर्शवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. दरम्यान पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडी कोठडीत असलेले खासदार संजय राऊत यांची रवानगी सोमवारी (दि. ८ ऑगस्ट) मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली. त्यामुळे मोहित कंबोज यांनी त्यावेळी केलेल्या सूचक विधानाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
 
 
शिवाय, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील सर्व काही बाहेर आल्यावर संजय राऊत यांना आर्थर रोडवरील नवाब मलिक यांचे शेजारी बनण्याचा बहुमान मिळेल. संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. असे सूचक विधान केले होते.  
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121