share updates: गुंतवणूकदारांचे २.५ लाख कोटी पाण्यात

    दिनांक  22-Feb-2022 17:05:11
|
                                 
share market
 
 
 
मुंबई: शेअर बाजारात मंगळवारी जोरदार घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३८३ अंशांनी कोसळला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे २.५ कोटी पाण्यात गेले आहेत. सेन्सेक्स ५७,३०० अंशांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या निफ्टी मध्येही मंगळवारी घसरणच दिसली. निफ्टी ११४ अंशांनी घसरून १७,०९२ अंशांवर बंद झाला. रशिया-युक्रेन सीमांवर असलेला तणाव अजूनही संपलेला नसल्याने आणि पुतीन यांच्या पूर्व युक्रेन मध्ये सैन्य पाठवण्याच्या निर्णयामुळे जागवरचे युद्धाचे ढग अजूनही विरलेले नाहीत. त्याचेच पडसाद मंगळवारी बाजारात दिसले.
 
 
बाजारात दिवसाच्या सुरुवातीपासून चढ-उतार दिसत होते. काही वेळेला सेन्सेक्सने आपल्या ५६,३९४ या नीचांकी पातळीला सुद्धा स्पर्श केला पण नंतर परत सावरला. आयटीसी, इंडसइंड बँक, विप्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर्स कोसळले. काही क्षेत्रांत शेवटच्या सत्रांमध्ये तेजी दिसल्याने बाजार सावरला. एचडीएफसी, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक बँक यांच्या शेअर्स मध्ये तेजी दिसून आली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.