‘पार्क’च्या सहकार्याने ‘जम्मू मका मिशन’ कार्यरत

जम्मू काश्मीर कृषी विभागाचा निर्णय

    07-Jan-2022
Total Views |
parc

काश्मीरी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास हातभार
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : जम्मू – काश्मीरमध्ये मका उत्पादन आणि प्रक्रिया व्यवस्था उभारण्यासाठी विवेक व्यासपीठ संचलित ‘पॉलिसी अडव्होकसी रिसर्च सेंटर’ अर्थात ‘पार्क’च्या सहकार्याने जम्मू मका मिशनचा प्रारंभ जम्मू – काश्मीरच्या कृषी विभागातर्फे करण्यात आला आहे.
 
 
जम्मू – काश्मीरमध्ये कृषी क्षेत्रात बदल घडविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे यासाठी पार्क गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जम्मू-काश्मीरमधील कृषी आणि फलोत्पादन उत्पादनांच्या विपणन धोरणांसदर्भात महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीस जम्मू – काश्मीरच्या प्रकल्प प्रमुख आणि ‘पार्क’च्या समन्वयक रुचिता राणे उपस्थित होत्या. मका, बाजरी आणि इतर पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेवटी शेतकर्यांीचे उत्पन्न वाढविण्यासाठी अवलंबण्यात येणार्याप तांत्रिक हस्तक्षेप आणि बाजार जोडणी प्रक्रियेवर चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश होता. त्याचप्रमाणे जम्मू जिल्ह्यात 25 हेक्टर क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर फॉक्सटेल बाजरीची पेरणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
 
 
'जम्मू मका मिशन'ला प्रारंभ
 
 
या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात राजौरी, पुंछ आणि बेनिहाल या जिल्ह्यांमध्ये मक्याची उत्पादकता वाढविणे आणि प्रभावी विपणन साध्य केले जाणार आहे. त्याचप्रमाणे मक्यावर प्रक्रिया युनिटच्या स्थापनेसाठी कृषी विभागाकडून जमीन देण्यात येणार आहे. यामुळे पारंपरिक मका उत्पादकांना सहाय्य होणार असून राज्यात कृषी विपणानाचे जाळे निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे प्रक्रिया युनिटद्वारे स्थानिक तरूणांच्या क्षमतांना वाव मिळण्यासह रोजगारनिर्मितीही होणार आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.