भाजपने ममता बॅनर्जींविरोधात निवडणूक आयोगाकडे दाखल केली तक्रार: 'हे' आहे कारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2021
Total Views |
west bengal _1  



कोलकाता -
भाजपने दावा केला आहे की, ममता बॅनर्जी यांनी १० सप्टेंबर रोजी भबानीपूर पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रात त्यांच्याविरुद्ध प्रलंबित प्रकरणांचा उल्लेख केलेला नाही. या प्रकरणाच्या संदर्भात मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांची मुख्य निवडणूक एजंट सजल घोष यांनी तक्रार दाखल केली आहे.
 
 
 
विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बहुमताने विजय मिळवला. मात्र, ममता बॅनर्जी यांना हार पत्कारावी लागली. बंगालमध्ये तृणमूलने सत्ता स्थापन केल्यानंतर टीएमसीचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी भबानीपूर येथील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी ममता बनर्जी उभ्या राहणार आहेत. १० वर्षांनंतर बॅनर्जी या आपल्या भबानीपूर या स्वत:च्या मूळ मतदारसंघात परत येत आहेत. मात्र, या पोटनिवडणुकीसाठी बनर्जी यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रावर भाजपने आक्षेप घेतले आहेत. या मतदारसंघातील संघातील भाजप उमेदवारांनी बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@