'PR 24x7'तर्फे कर्मचाऱ्यांसाठी 'मंथन' उपक्रमाची सुरुवात

    दिनांक  02-Jun-2021 18:56:17
|

MO _1  H x W: 0
मुंबई : इंटरनेटवर व्हीडिओ पाहून नवनवीन गोष्टी शिकण्याचे प्रयोग आता ई-एज्युकेशनमुळे शक्य होत आहेत. 'PR 24x7' या देशातील अग्रगण्य कंपनीतर्फे 'व्हरच्यूअल लर्निंग सिरीज'द्वारे अनोखा उपक्रम तयार केला आहे. 'मंथन' या उपक्रमाद्वारे कंपनीतील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न केले जातात. आठवड्यातून एकदा दर शुक्रवारी हा उपक्रम घेतला जातो. यामध्ये विविध विषयामधले तज्ज्ञांचे मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना दिले जाते. उपक्रमातून कर्मचाऱ्यांना विविध विषयातले मूलभूत ज्ञान तसेच एक दृष्टी मिळावी जिचा उपयोग फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही करता येईल, असा विश्वास आयोजकांना आहे.
 
 
 
'PR 24x7'चे अतुल मलिक्रम यांच्या मते "हे खूप गरजेचे आहे कि या कंपनीत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक गोष्टींची मूलभूत माहिती तरी असावी कारण,या आधूनिक काळात बदल फार वेगाने होत आहेत. तुम्हाला माहित नसते कि, कोणत्या ज्ञानाची तुम्हाला कधी गरज पडेल. प्रत्येक विषयाचे ज्ञान असणे हे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मदत करेलच पण त्याचबरोबर तुमच्या वयक्तिक जीवनात सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो".
 
 
ते म्हणाले कि, "त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे मूलभूत ज्ञान घेण्याची संधी कर्मचाऱ्यांसमोर उपलब्ध करणे हे आमच्या कंपनीचे कर्तव्य आहे. जे आम्ही 'मंथन' या कार्यक्रमाद्वारे पूर्ण करत आहोत". आतापर्यंत आमच्याकडे १५ 'मंथन' कार्यक्रम झाले असून त्या प्रत्येक कार्यक्रमात आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवून अतिथींचे मन जिंकले आहे.
आतापर्यंत 'मीडिया रिलेशनशिप', 'कंटेंट क्रिएशन', 'मीडिया मॉनिटरींग', 'क्रायसिस मॅनेजमेन्ट', 'प्रिंट' आणि 'ऑनलाईन' इत्यादी जनसंपर्क विषयाच्या विविध विषयांवर सत्रे घेण्यात आली आहेत . या व्यतिरिक्त, कठीण काळात चांगले काम कसे करावे, 'वर्क-लाइफ बॅलन्स', कसे करावे यावर सत्रे घेण्यात आली आहेत. घरातून काम, बचत आणि गुंतवणूकीत कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आणि कर्मचार्‍यांसाठी व्यक्तिमत्त्व विकसन यावरही सत्रे आयोजित केली गेली होती.
 
 
 
'स्टेप लर्निंगचे' संस्थापक आणि 'लीडरशिप ट्रेनर' - सानिल राव, 'केव्हीपीचे' वरिष्ठ व्यवस्थापक - अनिल जैन, 'एएसबी कम्युनिकेशन्सचे' व्यवस्थापकीय संचालक - ब्रिज किशोर, 'मिस सेंट्रल इंडिया' -अर्चना प्रसाद, 'अ‍ॅड फॅक्टर पीआरच्या' सेवानिवृत्त वरिष्ठ 'व्हीपी'- अतुल टकले,सल्लागार आणि प्रशिक्षक - मयंक बत्रा, 'हॅपीनेस कोच '- जीतेंद्र जैन सारख्या डॉक्टरांना त्यांचे ज्ञान आणि अनुभव शेअर करण्यासाठी पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते . प्रश्न - उत्तरे सत्र देखील आयोजित करण्यात आले होते ज्यात अतिथींनी उपस्थितांच्या प्रश्नांची आणि उत्सुकतेची उत्तरे दिली.ही संस्था आपल्या कर्मचार्‍यांच्या हितासाठी आगामी काळात मंथन मालिका आयोजित करत राहणार आहे , जेणेकरून ते स्वतःसाठी चांगले भविष्य घडवू शकतील.
 
 
 
आपल्या हटके कल्पनांमुळे प्रसिद्ध असणाऱ्या 'PR 24x7' या कंपनीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की 'वादळातसुद्धा जर तुम्ही आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असाल तर तुम्हाला नक्कीच उज्ज्वल दिवस दिसणार आहे'. वेगळ्या कल्पनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'PR 24x7' तर्फे एक वेगळाच आयाम गाठला आहे. 'PR 24x7' या कंपनीच्या मंथन या नव्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.