आयपीएल २०२१ रद्द होणार? बायोबबल असूनही खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2021
Total Views |

IPL_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : एकीकडे देशभर कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. तर, दुसरीकडे आता याची झळ आयपीएल २०२१मध्येही जाणवू लागली आहे. एकाच दिवशी २ खेळाडू आणि ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सोमवारी ०३ में रोजी होणारी कोलकत्ता नाईट रायडर्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना हा पुढे ढकलला आहे. आयपीएल २०२१ वर आलेल्या या कोरोनाच्या काळ्या ढगांमुळे आता ही स्पर्धा रद्द होते का? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
 
 
 
 
 
 
बायोबबलचे सरंक्षण असतानादेखील कोरोणाचा शिरकाव हा संघांमधील खेळाडू आणि सदस्यांमध्ये झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे 'काही झाले तरी आयपीएल होणारच' हा पवित्रा सोडते कि नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, लॉकडाऊनमुळे घरी बसून या स्पर्धेचा आनंद घेणारा एक मोठा क्रीडा वर्ग आहे. असे झाल्यास त्यांच्यामध्येही मोठी नाराजी पसरेल, याची चिंतादेखील बीसीसीआयला असणार हे नक्की.
 
 
 
 
 
केकेआरच्या २ खेळाडूंना कोरोनाची लागण
 
 
आधीच कोरोनाकाळात आयपीएलच्या आयोजनावर बीसीसीआयवर जोरदार टीका होत होती. मात्र, केकेआरच्या संघातील २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्याची वेळ बीसीसीआयवर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केकेआरच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. आता या दोन खेळाडूंना विलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्या संघातील इतर सर्व सदस्यांची आणि हॉटेल स्टाफची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आरसीबीविरुद्धचा सामना रद्द केल्याची माहिती आहे.
 
 
 
 
 
 
 
सीएसकेचे ३ सदस्य कोरोनाबाधित
 
 
दरम्यान, सीएसकेचे ३ सदस्य कोरोनाबाधित असल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि संघाच्या बसमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. चेन्नईच्या खेळाडूंपैकी कुणालाही कोरनाची लागण झालेली नसून सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट रविवारी झालेल्या टेस्टमध्ये निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसमोर एक खूप मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच, आयपीएल २०२१ची स्पर्धा रद्द होणार का? अशी चर्चा सोशल मिडियावर जोर धरू लागली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@