आर्यन खानच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट, म्हणाला...

ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक झालेल्या आर्यनसाठी बॉलीवूड सरसावले

    दिनांक  07-Oct-2021 15:15:47
|

Hritik Roshan_1 &nbs
 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी एनसीबीने अटक केली. मुंबई-गोवा क्रुझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने छापा टाकल्यानंतर त्याच्यासोबत ८ जणांना अटक केली गेली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तर तापलेच, शिवाय बॉलीवूडमध्येही आर्यन खानच्या सर्थानार्थ काही बॉलीवूडकर पुढे सरसावले. यामध्ये आता हृतिक रोशननेदेखील त्याच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने, 'आर्यनच्या आयुष्यात आलेल्या हा कठीण काळ त्याला चांगली व्यक्ती बनण्यास मदत करेल आणि उद्याचा दिवस सुर्याप्रमाणे उजळेल.' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
हृतिकने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, "माझ्या प्रिय आर्यन, जीवन एक विचित्र प्रवास आहे. हे उत्तम आहे, कारण ते अनिश्चित आहे. हे खूप मोठे कारण आहे की, ते तुम्हाला कर्व्हबॉल प्रमाणे फेकते. पण देव दयाळू आहे. तो फक्त सर्वात लढाऊ व्यक्तींना खेळण्यासाठी सर्वात कठीण चेंडू देतो. तुम्हाला माहित आहे की, जेव्हा तुम्ही निवडले जातात तेव्हा या गोंधळात तुम्हाला तुमच्या स्वतःवर नियंत्रण ठेवताना दबाव जाणवू शकतो. मला माहित आहे की, तुम्हाला ते आता वाटले पाहिजे. राग, गोंधळ, असहायता. हिरोला आतून बाहेर काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण सावध रहा, तेच घटक चांगल्या गोष्टींना जाळूनदेखील टाकू शकतात."
 
 
 
पुढे त्याने म्हंटले आहे की, "हे जाणून घ्या की, तुम्ही त्या सर्वांसोबत चांगले वाढू शकता. मी तुला एक लहान मुलगा म्हणूनही पाहिले आहे आणि आता एक चांगल अमानुस म्हणूनही पहिले आहे. जर तू या सगळ्या गोष्टी चांगल्याप्रकारे जोडल्यास तर एक उत्तम माणूस होशील. नेहमी शांत राहा. निरीक्षण कर. हे क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, तुझे निर्माते आहेत. आणि स्वतःवर विश्वास ठेव, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत." असा सल्ला दिला आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.