कंगनाला व्हावे लागणार १४ दिवस होम क्वारंटाईन

    दिनांक  07-Sep-2020 21:51:13
|

Kangana_1  H x
 
मुंबई : मुंबईबद्दल वक्तव्य केल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना रानौत असा सामाना रंगला आहे. यावेळी मुंबई महापालिकेने अचानकपणे तिच्या पाली हिलमधील कार्यालयाची पाहणी केल्यानंतर आता तिला मुंबईत येताच होम क्वारंटाईन करणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकाच्या नियमांनुसार तिला १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याची आठवण महापौरांनी करून दिल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
“अभिनेत्री कंगना रानौत ९ सप्टेंबरला मुंबईत दाखल होणार आहे. ती मुंबईत राहत असल्यामुळे ती विमानमार्गे मुंबईत आली तर तिला नियमानुसार होम क्वारंटाईन व्हावेच लागेल. हा केंद्र आणि राज्य सरकारने बनवून दिलेला नियम आहे. आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करत आहोत. समजा, ती सात दिवसांपेक्षा कमी दिवस मुंबईत राहणार असेल तर होम क्वारंटाईन नियम तिला लागू होणार नाही.” अशी माहिती अधिकाऱ्यांकडून दिली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणी कंगना यांच्यातील हा वाद आणखीनच वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.