सीबीआयकडून रियाला समन्स जारी, थोड्याच वेळात चौकशी

    दिनांक  28-Aug-2020 10:35:37
|
rhea_1  H x W:
 
 


मुंबई :
सीबीआयकडून रियाला समन्स जारी करण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आज चौकशी होणार आहे. रिया चक्रवर्तीला सीबीआयने आज चौकशीसाठी बोलावले आहे. आज मुंबईत डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये तिची चौकशी होईल. यासाठी रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसकडे निघाल्याची माहिती आहे. रियासोबत तिचा भाऊ शौविक देखील आहे. याआधी रियाची ईडीने देखील चौकशी केली आहे. दरम्यान सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा देखील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.गेल्या आठवड्याभरापासून सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरजची चौकशी करण्यात आली आहे. गेले सहा दिवस दररोज त्यांची चौकशी सुरू आहे. यानंतर आता आठवड्याभरानंतर रियाला सीबीआयनं समन्स बजावलं. रिया तिच्या जुहूमधील घरातून सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घरातून निघाली. तिच्यासोबत तिचा भाऊ शोविकदेखील गाडीत आहे. थोड्याच वेळात रिया सांताक्रूझमधील डीआरडीओच्या अतिथीगृहात पोहोचेल. त्यानंतर सीबीआयकडून तिची चौकशी सुरू होईल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.