‘लॉकडाऊन’मध्ये सुशांतच्या घरी पार्टी झालीच कशी?

    दिनांक  01-Aug-2020 17:12:59
|
Anil Prab_1  H

शिवसेना नेत्याची गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी!


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत बॉलिवूडमधील बड्या लोकांची चौकशी झाली आहे मात्र, मुंबई पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागले नाही. सुशांतच्या प्रकरणात महाराष्ट्र पोलीस व सरकार अनुकूल नसल्याच्या चर्चांनंतर आता शिवसेनेने या प्रकरणात उडी घेतली आहे.


लॉकडाऊनच्या काळात सुशांतच्या घरी पार्टी कशी झाली? त्या पार्टीला कोण उपस्थित होतं? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. मुंबई पोलिस सक्षम असल्यामुळे या प्रकरणाचा छडा लावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, सुशांतच्या अचानक जाण्याने अनेक प्रश्नांना वाचा फुटली आहे. नेपोटिझम वरून आता हे प्रकरण मनी लॉंड्रींगपर्यंत आले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सुशांत प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असल्यामुळे ईडीने कारवाई करावी, अशी मागणी केली होती त्यानंतर ईडीनेही या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. ईडीने याप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोवितवर गुन्हा दाखल केला आहे.


सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी भावना सामान्यांमध्ये आहे, पण राज्य सरकार त्यासाठी तयार नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. ईडीच्या कारवाईनंतर आता शिवसेनेने लॉकडाऊन काळात सुशांतच्या घरी पार्टी झाली त्याची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.