अभिनेत्री दिव्या चौक्सीचे कर्करोगामुळे निधन

    दिनांक  13-Jul-2020 11:22:40
|
Divya_1  H x W:


कर्करोगाशी लढता लढता मागितली होती मदत!


मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगाशी लढा देणारी अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौक्सीचे सोमवारी निधन झाले. तिची ही झुंज अपयशी ठरली आहे. यासंदर्भात दिव्याची मावस बहिण सौम्याने फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. दिव्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निधनापूर्वीच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ती मृत्यूच्या जवळ आहे. दिव्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोस्ट पाहून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.


मृत्युपूर्वी दिव्याने इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, 'शब्द ती गोष्ट सांगू शकत नाहीत जे मला सांगायचं आहे. माझ्याकडे बरेच दिवसांपासून सहानुभूति देणारे मेसेज येत आहेत. परंतु, वेळ अशी आहे की, मी तुम्हा लोकांना सांगू इच्छिते की, मी सध्या मृत्यूशय्येवर आहे. परंतु, मी खंबीर आहे. कदाचित अजिबात दुःख नसलेलं आणखी एक आयुष्य असतं. सध्या कोणताच प्रश्न नाही. फक्त देवच जाणतो की, तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात.'


दरम्यान, दिव्या सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नव्हती. परंतु, तिने तिच्या शेवटच्या ट्वीटमध्ये मदत मागितली होती. दिव्याने आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'कोणाला misseltow थेरपीबाबत माहिती आहे का? मला मदतीची गरज आहे.' चित्रपट 'है अपना दिल तो आवारा' मधून दिव्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. दिव्या अनेक टीव्ही शो आणि जाहीरातींमध्येही दिसून आली होती.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.