"सॅल्युट ताई, अशीच लढ ! आम्ही पाठीशी आहोत"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2020
Total Views |
Ajan_1  H x W:



मशिदीच्या भोंग्याविरोधात जाब विचारणाऱ्या करीश्मा भोसलेला देशभरातून पाठींबा



मुंबई : "माझ्या घराच्या खिडकीबाहेरच मशिदीचा भोंगा आहे, लाऊड स्पीकरवर अजान सुरू असल्याचा त्रास होतो, तुम्ही भोंग्याचा आवाज कमी करा," असा दम भरणाऱ्या करीश्माच्या भोसलेच्या कामगिरीचे देशभरातून कौतूक होत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, लाऊड स्पीकरद्वारे अजाण हा इस्लामचा भाग नाही, असा निर्देश असतानाही राज्य सरकार या निर्णयांची अंमलबजावणी करू शकलेली नाही. आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल मानखुर्द येथे राहणाऱ्या एका मुलीने आवाज उठवत पोलीसांत धाव घेतली. 


पोलीसांनीही प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत मशिदीतील लोक आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ जून रोजी घडलेल्या या प्रकाराचे देशभर पडसाद उमटू लागले. करीश्माला घर सोडून जा, अशा धमक्या येऊ लागल्या. तिचे व्हीडिओज अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. मात्र, ही गोष्ट मशिदीतील लोकांवरच उलटले. करीश्माला देशभरातून पाठींबा मिळू लागला आहे. दोन दिवसांत लाखो लोकांनी तीने ट्विट केलेला व्हीडिओ पाहिला. तसेच ११ हजारहून अधिक जणांनी तिला फॉलो केले आहे.



प्रकरण नेमके काय ?

मानखुर्द भागात राहणाऱ्या करीश्मा भोसले या तरुणीने घराबाहेरील मशीदीच्या भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. दिवसातून पाच वेळा वाजणाऱ्या या भोंग्याचा आम्हाला त्रास होतो, त्यावर उच्चारली जाणारी अजाण आम्हाला समजत देखील नाही, मग आमच्याच घराबाहेर हा भोंगा का लावला जात आहे, असा प्रश्न तिने विचारला होता. मात्र, सहाजिकच मानखुर्दसारख्या मुस्लीम बहुल भागात तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला.



भोंग्याचा आवाज कमी करायला मशीद तुझ्या बापाची आहे का, असा उलटा जाब मशीदीतील लोकांनी तिला विचारत हुसकावून लावले. हे प्रकरण मानखुर्द पोलीसांत गेल्यावर संबंधित मुलीलाच दरडावून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेली २० वर्षे अजाण लाऊडस्पीकरवर सुरू आहे, आम्ही ती बंद किंवा आवाज कमी करणार नाही, अशी दमदाटी तिथल्या महिलांकडून तिला करण्यात आली आहे.






आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, "माझे इथे ऐकणारे कुणीच नाही. हिंदू दडपणाखाली आहेत, आवाज कमी करण्यासाठी संबंधितांना मी सांगितल्यावर तिथले स्थानिक माझ्या भोवती जमले, मला उलट प्रश्न विचारू लागले. इथले स्थानिक आमदार अबू आझमीही माझे म्हणणे ऐकत नाहीत. 'त्रास होत असेल तर घर सोडून जा', असा सल्ला मला देण्यात आला."






करीश्मा जेव्हा मशिदीच्या भोंग्याचा आवाज कमी करा, असे सांगण्यासाठी गेली तेव्हा तिचा व्हीडिओ बनवून व्हायरल करण्यात आला. तिझ्याबद्दल वादग्रस्त संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल करा, असे आवाहन तिथल्या स्थानिकांनी केले. केवळ मशिदीच्या भोंग्याचा आवाज कमी व्हावा, अशी मागणी करणाऱ्या एका मुलीला इतके हाल सोसावे लागत आहेत.




दरम्यान, याबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. करीश्माने पोस्ट केलेले व्हीडिओज १५ हजार जणांनी पाहिले आहेत. मला न्याय मिळायला हवा, घरासमोरील भोंग्याचा आवाज कमी व्हावा, अशी मागणी तिने केली आहे. पोलीसांत तक्रार करणाऱ्या करीश्माला पोलीसांनीच घटनास्थळाहून घरी जाण्यास सांगितल्याचाही एक व्हीडिओ तिने ट्विट केला आहे.




@@AUTHORINFO_V1@@