लॉकडाऊनमध्ये खेळाडूंवर उपासमारीची वेळ

    14-May-2020
Total Views | 38

sports_1  H x W
 
 
 
मुंबई : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरामध्ये लॉकडाऊनला ५० दिवस होऊन गेले. यामध्ये हातावर पोट असणाऱ्या गरीब मजुरांचे अतोनात हाल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती स्थानिक खेळाडूंचीही आहे. महाराष्ट्रात जिल्ह्यांमध्ये अनेक खेळाडू आहेत ज्यांचा उदरनिर्वाह वेगवेगळ्या स्पर्धांवर चालतो. परंतु, लॉकडाऊनमुळे जगभरातील सर्वच स्पर्धांवर ब्रेक लागल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
 
 
 
वडीलांना अर्धांगवायूचा झटका आणि त्यामध्ये लॉकडाऊमुळे आईवर बेरोजगारीची आलेली कुऱ्हाड यामुळे भारताच्या उदयोन्मुख धावपटू प्राजक्ता गोडबोले आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडे एकवेळच्या जेवणाचेही पैसे नाहीत. २४ वर्षीय प्राजक्ता या नागपूरच्या सिरासपेठ येथे एका झोपडीत आपल्या आई-वडीलांसह राहतात. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केलेले आहे. यांच्यासारखे आणखीनही काही खेळाडू आहेत ज्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन लॉकडाऊन लवकर संपावा अशीच इच्चा त्यांच्यासह त्याच्या कुटुंबियांची आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121