रत्नागिरीत दिवसभरात २२ रुग्ण कोरोना रुग्ण

    दिनांक  13-May-2020 21:58:20
|
Ratnagiri _1  H
 
रत्नागिरी : जिल्ह्यात आज तब्बल २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याने चिंतेचे वातावरण आहे. एकूण २४ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील तब्बल २२अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी इतक्या रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


मंडणगड तालुक्यात ११, दापोली चार रत्नागिरीत सात रुग्ण सापडले. रत्नागिरीतील सात पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार महिला व तीन पुरुष आहेत. मंडणगडच्या ११ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सात पुरुष व चार स्त्रिया आहेत. तर दापोलीत सापडलेले चार ही पॉझिटिव्ह पुरुष आहेत. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे.यातील बहुतेक जण मुंबईहून आले आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.