‘थलायवा’ रजनीकांतने केले नागरिकत्व कायद्याचे समर्थन

    05-Feb-2020
Total Views | 143
rajanikant_1  H




काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी सीएएबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत : रजनीकांत


चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतने बुधवारी नागरिकत्व संशोधन कायद्यावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया दिली. या कायद्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘सीएए मुसिलमांच्या विरोधात नाही. जर असे झाले तर सर्वात आधी मी या कायद्याविरोधात आवाज उठवेन.’ यापूर्वी केंद्र सरकारनेही नागरिकांना स्पष्ट केले आहे की, या कायद्यामुळे देशातील नागरिकांना घाबरण्याची काहीच गरज नाही.


नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर देशभरात कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. यातच सुपरस्टार रजनीकांतने या कायद्याचे समर्थन केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. याबाबत बोलताना रजनीकांत म्हणाले की, "देशाच्या विभाजनानंतर अनेक मुसिलमांनी भारतात राहण्याचे ठरवले. पाकिस्तानातूनही अनेक मुसलमान भारतात राहण्यासाठी आले, त्यांना आता देशाबाहेर काढले जाऊ शकत नाही. काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी सीएएबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. सीएए मुसिलमांच्या विरोधात नाही. जर असे झाले तर सर्वात आधी मी या कायद्याविरोधात आवाज उठवेन." सीएएसोबतच रजनीकांत यांनी राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर)चेही समर्थन केले आहे. ते म्हणाले की, "देशाबाहेरुन येणाऱ्या व्यक्तींबद्दल माहिती मिळवण्यासाठी एनपीआर गरजेचे आहे. काँग्रेस सरकारनेही याआधी हा कायदा लागू केला होता."
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121