इस्लामिक स्टडीज् प्रवेश परीक्षेत टॉप करणारा बिगर मुस्लीम विद्यार्थी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2020
Total Views |

NEWJ_1  H x W:
 
 



अलवर : राजस्थानातील अलवर जिल्ह्यात राहणाऱ्या २१ वर्षीय शुभम यादव याचा डंका संपूर्ण देशात वाजत आहे. केंद्रीय विश्वविद्यालय, काश्मीर (सीयुके) येथून इस्लामिक स्टडीज् प्रवेश परिक्षेत तो पहिला आला आहे, असे करणारा शुभम हा पहिला बिगर मुस्लीम आणि बिगर काश्मीरी विद्यार्थी ठरला आहे. राजस्थानचा हा पठ्ठ्या या नव्या विक्रमामुळे चर्चेत आला आहे. अलवर येथील शुभम यादवने नवा इतिहास नोंदवला आहे.
  
 
'इस्लामफोबिया' पाहून वाढली उत्सुकता
 
निकालानंतर दिलेल्या एका मुलाखतीत यादवने जगभरात सुरू असलेल्या 'इस्लामफोबिया' पाहून या विषयात आपण रस घेतला, असे सांगितले. असे का होत आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हणणे आहे. एकमेकांचा धर्म समजून घेणे हे महत्वपूर्ण आहे. जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण विषय समजून घेऊ शकत नाही, असेही तो म्हणतो.
 
 
 
प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा
 
सेंट्रल यूनिवर्सिटी, कश्मीर येथून मास्टर्समध्ये टॉप करणाऱ्या शुभमला प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची इच्छा आहे. भविष्यात प्रशासनाला अशा लोकांची गरकज आहे, जे लोक धर्म समजू शकतील. यादवने दिलेल्या माहितीनुसार, त्याने प्रवेश परीक्षेशिवाय अन्य परीक्षा दिली होती. शुभमने दिल्ली विद्यापीठात लॉ विषय़ाची प्रवेश परीक्षाही दिली होती. त्याचा निकाल १८ नोव्हेंबर रोजी येणार आहे. जर दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही तर इस्मामिक धर्माचा अभ्यास करणार आहे, असे तो म्हणतो.
 
 
सकारात्मक बदल
 
परीक्षेत अव्वल आल्यानंतर धार्मिक अध्ययन विभागाचे प्रमुख हमीदुल्लाह माराजी यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे. तसेच प्रवेश घेण्यासाठीही आमंत्रित केले आहेा. हा एक सकारात्मक संदेश आहे. अन्य धर्माविषयी जाणून घेण्यासाठी असे विद्यार्थी इच्छुक आहेत हा सकारात्मक संदेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@