शरद पवारांच्या सभेला 'रिकाम्या खुर्च्या'

    दिनांक  12-Apr-2019
नाशिक : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नाशिक येथील सभेला गर्दी नसल्याने रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ सय्यद पिंपरी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने जिल्ह्यात एकच कुजबुज सुरु झाली आहे.

 

सय्यद पिंप्री हे गाव शेतकऱ्यांचे गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या सभेला अभूतपूर्व गर्दी होईल अशी अपेक्षा होती, मात्र घडले उलटेच. याचमुळे पवारांची सभा आणि रिकाम्या खर्च असा जिल्हाभर चर्चेचा विषय चालू आहे. नागरिकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे स्वतः पवारदेखील अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी आपले भाषण काही मिनिटातच आवरते घेतले.

 

ढिसाळ नियोजनामुळे सकाळी १० वाजता होणारी सभा १२ वाजता सुरु झाली. त्यामुळे या सभेस वाढत्या उन्हाचा देखील फटका बसला असल्याचे बोलले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat