राहुल गांधींनी तातडीने माफी मागावी; भाजप आक्रमक

    दिनांक  16-Dec-2019 10:55:07
|


bjp_1  H x W: 0


नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरचे पहिले अधिवेशन नागपूर इथे होत आहे. कामकाजाचा आजचा पहिला दिवस असून विरोधकांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधीनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी ताबडतोब माफी मागावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत भाजपने ‘राहुल गांधी माफी मागो’ म्हणत आंदोलन सुरु केले आहे. ‘सावरकरांचा अपमान देश सहन करणार नाही’ अशा घोषणादेखील दिल्या जात आहेत. 'मी सावरकर' लिहिलेल्या टोप्या घालून भाजपचे आमदार विधानसभेत पोहोचले आहेत.