सत्तेसाठी कुणी इतके लाचार कसे होऊ शकते : देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

    दिनांक  15-Dec-2019 16:37:37
|
Uddhav Thackeray_1 &नागपूर : "कालपर्यंत सावरकरांबद्दल आक्रमक ठरलेले शिवसेनेचे नेते आज सत्तेसाठी लाचार झाल्याने मवाळ भूमीका कशी घेतात." असे म्हणत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घेतलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. सावकरांच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत राहुल गांधी यांनी सावकरांवर विधान करून त्यांचा मोठा अपमान केला आहे, असे म्हणत राहुल गांधी माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी ठाम भूमीका नागपूर येथे अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घेतली. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १२ वर्षे ज्या अंदमानच्या तुरुंगात काढली तिथे काही तास राहुल गांधी काढू शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.

 

"शिवसेना आणि भाजपचे जेव्हा सरकार होते. त्यावेळी सर्व निर्णय संगनमताने घेतले जायचे. मात्र, सध्याचे स्थगितीचे सरकार आहे कुठल्याही बाबतीत गंभीर नाही. राज्य सरकारच्या कामकाज आणि हिवाळी अधिवेशनाबद्दलचा समाचार फडणवीस यांनी घेतला. हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार घातला. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

ते म्हणाले, "सरकार स्थापित होऊन तीन आठवडे होत आले. तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. या तिन्ही पक्षांमध्ये खात्यांवर मतभेद आहेत. हिवाळी अधिवेशनाला गांभीर्याने घेतले जात नाही. शेतकऱ्यांना मदत अजुनही मिळालेली नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.