वाड्यात भाजपच्या नगरसेविका सविता वनगा यांच्या पुढाकाराने सहयोग नगरात राबविली स्वच्छता मोहीम

    24-Sep-2026
 
 Savita Vanga Wada Cleanliness Drive
 
वाडा (Savita Vanga Wada Cleanliness Drive) : वाडा नगरपंचायतीच्या विभाग क्रमांक ११ मधील सहयोग नगर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले अनावश्यक गवत व झाडाझुडपांची गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी छाटणी करण्यात आली. नगरसेविका तथा भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्या सविता अनंता वनगा यांच्या देखरेखीखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
 
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या गवतामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही छाटणी करण्यात आली. परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा, तसेच नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी नगरसेविका वनगा यांनी पुढाकार घेतला.यावेळी स्थानिक नागरिक शिवाजी पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पाणीपुरवठा, पथदिवे आणि स्वच्छता या मूलभूत नागरी सुविधांबाबत नगरसेविका वनगा सतर्क राहून आवश्यक कामे करून घेत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका नगरसेविका सविता वनगा यांनी घेतल्याचे सांगून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. (Savita Vanga Wada Cleanliness Drive)
 
 




संबंधित मजकूर