मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या यंदाच्या आत्मार्पण दिनापासून ते जयंतीपर्यंतच्या म्हणजेच फेब्रवारी ते मे २०२५ या कालावधीत निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार रामचंद्र प्रतिष्ठान, दादर, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये त्यांच्या विचारांवर आधारीत राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्हा कारागृहातील बंदिवानांमध्येही राष्ट्रभक्ती रुजवण्याचा धाडसी प्रयत्न यातून करण्यात आला. त्याचबरोबर मुंबई (ऑर्थर रोड), नाशिक रोड, अलिबाग, सोलापूर, जळगाव, नागपूर, अमरावती अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कारागृहांमध्येही हा उपक्रम यशस्वीपणे राबवून बंदिवानांमध्ये स्वातंत्र्यवीर तसेच क्रांतिकारकांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. बंदिवानांना राष्ट्रभक्तीपर ग्रंथसंपदादेखील दिली गेली. या उपक्रमाचे कारागृह प्रशासनाकडून विशेष प्रशंसादेखील करण्यात आली आहे. हा उपक्रम यापुढील काळातही अन्यत्र सुरु राहणार असल्याचे संस्थेच्या संचालिका नयना शिंदे यांनी सांगितले.
रामचंद्र प्रतिष्ठान (रजि.)
बी-२६, न्यू अंबालाल चाळ, डॉ. अॅनिबेझंट रोड, वरळी नाका, मुंबई ४०००१८.
संपर्क ८७७९३५९२१० ई मेल ramchandrapratisthan@gmail.