नवी दिल्ली : आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा दिल्ली विधानसभेत पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशातच शीशमहालच्या नूतनीकरणातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागास या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली असल्याचे आदेश १३ जानेवारी रोजी देण्यात आली.
या प्रकरणी आता भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी दखल घेतली की, १४ ऑक्टोबर २०२४ रोजी गुप्ता यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ६ फ्लॅग स्टाफ रोड मधील निवासस्थानी बेकायदेशीर बांधकामावर केंद्रीय आयोगाकडे तक्रार दाखल केली.
भाजप नेत्याने आरोप केला होता की, अरविंद केजरीवाल यांनी ४० हजार चौरस म्हणजेच ८ एकरात अलिशान शीशमहल बांधला. त्यासाठी त्यांनी बांधकाम नियमांचे उल्लंघन केले. तक्रारीत असे नमूद करण्यात आले की, राजपूर रस्त्यावरील प्लॉट क्रमांक ४५ आणि ४७ आणि दोन बंगले यासह सरकारी मालमत्ता पाडण्यात आल्या आणि नवीन घरांच्या माध्यमात विलीन करण्यात आले.
सीव्हीसीने या प्रकरणी १६ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदवली आहे. हे प्रकरणावर गांभीर्याने चौकशी सुरू केली आहे. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सीव्हीसीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्राथमिक तथ्यात्मक अहवालामध्ये ८ एकरांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले होते.
या प्रकरणात सविस्तर चौकशीत नूतणीकरणावर खर्च करण्यात आलेली कायदेशीर रक्कम होती की नाही आणि त्यात काही अर्थिक अनियमितता होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. याचाच तपास केला जाणार असल्याचे विजेंद्र गुप्ता म्हणाले आहेत.