जादुई जेलीफिश वाहतूक बेट

Total Views | 36
Jellyfish Transport


फॅरोई बेटांमधील दोन सर्वात मोठ्या बेटांना जोडणारे, रंगीबेरंगी बोगदे परदेशी पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण बनले आहे. हा समुद्राखालील बोगदा, जगातील अशा प्रकारचा पहिलाच आहे! ‘जेलीफिश’ राऊंडअबाऊट, अटलांटिक महासागराखालील दोन फॅरो बेटांना जोडतो. जेलीफिश वाहतूक बेट, फॅरो बेटांवरील पर्यटकांचे नवीनतम आकर्षण केंद्र बनले आहे.

फॅरो बेटे ही अटलांटिकच्या ईशान्य भागात, आईसलॅण्ड आणि नॉर्वेच्या मध्यभागी स्थित एक बेट आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे ५५ हजार आहे. देशाच्या रस्ते व्यवस्थेत, अंदाजे ५०० किलोमीटरचे राष्ट्रीय रस्ते आहेत, त्यापैकी ३० किलोमीटरचे बोगदे आहेत. या व्यतिरिक्त फॅरो बेटांवर २३ किलोमीटरचे समुद्राखालील बोगदे आहेत. २०२४ सालापर्यंत, देशात २२ नियमित आणि चार समुद्राखालील बोगदे आहेत. अनेक नवीन बोगदे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. समुद्राखालील बोगदे हे चालणार्‍यांसाठी नसून, केवळ मोटार वाहतुकीसाठी बनवलेले आहेत. समुद्राखाली असलेले बोगदे देशात येणार्‍या विदेशी पर्यटकांना, इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्याचा एक जलद मार्ग आहे. फॅरो बेटांचा समावेश असलेल्या १८ बेटांपैकी, सात बेटे रस्ते पूल आणि बोगद्यांनी जोडलेली आहेत. जलचर संकल्पनेवर आधारित असलेली समुद्राखालील ही वाहतूक बेटे पर्यटकांचे आकर्षण आहे, ज्याने सोशल मीडियावर जगाचे लक्ष वेधले आहे. हा राऊंड फारोई कलाकार, ट्रोंडुर पॅटर्सन यांनी डिझाईन आणि सजवला आहे. ज्यांना तो जेलीफिशसारखा दिसावा अशी इच्छा होती. ही रचना नैसर्गिक खडकापासून निर्माण केली असून, हिरव्या आणि निळ्या दिव्यांनी प्रकाशित आहे. ११.२ किमी अर्थात ६.९ मैल लांबीच्या दोन ठिकाणांमधील, प्रवासाचा वेळ बेटांच्या पर्वतीय रस्त्यांवरून एका तासापेक्षा जास्त आहे. हाच वेळ, समुद्राखालील या बोगद्यांमुळे फक्त १५ मिनिटांवर आला आहे. याठिकाणाहून मोटार वाहनांमधून लोकांची २४ तास ये-जा सुरू असते.

या मार्गावर प्रवासासाठी चारचाकी वाहनांकडून ७५ डॅनिश क्रोनर अर्थात सुमारे १२ अमेरिकन डॉलर्स टोल आकारला जातो. प्रवासी इथे वार्षिक पासही घेऊ शकतात. हा मार्ग फारोई समाजात परिवर्तन घडवून आणेल. लोकांना, प्रदेशांना आणि अर्थव्यवस्थेला नवीन मार्गांनी जोडेल, अशी अपेक्षा आहे. या वाहतूक बेटाच्या मध्यभागी, नैसर्गिक खडकाचा एक महाकाय मध्यवर्ती स्तंभ आहे. हा महाकाय स्तंभ एक प्रख्यात फारोई कलाकार, ट्रोंडुर पॅटुरसन यांनी रोषणाईने आणि आकर्षक रंगसंगतीने सजवला आहे. या स्तंभाच्या सभोवताली, ८० मीटर लांबीचे स्टील शिल्प असून, ते मानवी आकाराच्या आकृत्यांचे प्रतिनिधित्व करते. या मानवी आकृत्या एकमेकांचे हात धरून आहेत. ज्या आकृत्या ज्वालामुखीच्याभोवती उपासकांसारखे प्रकाशाकडे टक लावून पाहतात.

सिंगल ट्यूब असलेला दोन-लेनचा समुद्राखालील बोगदा, पार करण्यासाठी केवळ आठ मिनिटे लागतात. या बोगद्याच्या सर्वात खोल पातळीवरील बिंदू, पाण्याच्या पृष्ठभागापासून १८९ मीटर अर्थात ६२० फूटावर आहे. या मार्गात तीन ट्यूब आहेत. ज्या एका आकर्षक चौकात एकत्र येतात. यातील एक ट्यूब, स्ट्रेयमोय बेटावरील राजधानी तोर्शवनशी जोडते. इतर दोन ट्यूब मार्गिका एस्टुरॉय बेटावरील,स्कालाफजोरडुर फजोर्डच्या दोन खाडी क्षेत्रांना जोडतात. ज्यामुळे या दोन खाडी क्षेत्रांमधील प्रवासाचे अंतर २५ किमीवरून, फक्त पाच किमीपर्यंत कमी झाले आहे. याव्यतिरिक्त, बोगदा फॅरो बेटांच्या दोन सर्वात मोठ्या शहरांमधील तोर्शवन आणि क्लाक्सविक दरम्यानचा प्रवासाचा वेळ, ७० मिनिटांवरून सुमारे ३५ मिनिटे म्हणजेच, निम्मा करण्यास मदत करतो. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात लांब ट्रॅफिक सबसाऊंड बोगदा आहे. एस्टुरोयार्टुनिलमधून ड्रायव्हिंगचा रंगीबेरंगी बोगद्यातून गाडी चालवताना अनुभव, एफएम रेडिओ ९७वर ट्यून इन करून आणखी समृद्ध केला जाऊ शकतो. या चॅनेलवर तुम्ही, समुद्रतळाखाली तुमच्या राईडसाठी बनवलेले फारोई संगीतकार आणि ध्वनी-अभियंते यांचे खास तयार केलेल्या धून ऐकू शकता. दररोज, सहा हजारांहून अधिक वाहने या बोगद्यातून प्रवास करतात.खरंतर, हा प्रवास जादुई आहे. ज्यामध्ये बदलत्या रंगांसह शिल्पकला चौकइतका आकर्षक आहे की, काहीजण त्याची तुलना सूर्यप्रकाशात चमकणार्‍या अरोरा बोरेलिस किंवा जेलीफिशशीही करतात.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121