मुंबई, दि.१५ : प्रतिनिधी मुंबईच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर अहमदाबाद ते मुंबई अशी वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल रन घेण्यात आली. भारताची नव्या रुपाची प्रिमियम ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत आता लवकरच धावण्यास सज्ज झाली होणार आहे आणि तिची चाचणी सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत बुधवार, दि.१५ रोजी वंदे भारत स्लीपर ट्रेन दाखल झाली होती.
वंदे भारत स्लीपर ट्रेन आता स्लीपर बर्थच्या रुपात येणार आहे. या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी अंतिम टप्प्यात असून चाचणी दरम्यान तब्बल १३० किलोमीटर प्रतितास वेगाने वंदे भारत स्लीपर अहमदाबाद ते मुंबई धावली. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतीय रेल्वेने सादर केलेली एक अत्याधुनिक आणि आरामदायी ट्रेन आहे. जी लांब पल्ल्याच्या प्रवासाला सोयीस्कर आणि आरामदायी बनवण्याच्या उद्देशाने लवकरच सुरू होणार आहे. नवीन वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनचा यामध्ये ब्रेकिंग सिस्टीम, एअर सस्पेंशन, कप्लर फोर्सची चाचणी घेण्यात आली. या ट्रेनची १८० किमी/तास वेगाने धावण्याची क्षमता असून तिची चाचणी वळणदार ट्रॅकवरही घेण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये पेन्ट्री कारही असणार आहे. याशिवाय गार्ड कोच, लगेज कोच असणार आहे.