मुंबई, मुंबई मेट्रोची मार्गिका ४ वडाळा ते कासारवडवली य मार्गिकेच्या उभारणीत एक महत्वाचा टप्पा पार करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला यश आले आहे. कापूरबावडी जंक्शनजवळ एमएमआरडीएने स्टील स्पॅन यशस्वीरित्या बसवला आहे. हा स्टील स्पॅन मेट्रो लाईन ४ कॉरिडॉरच्या प्रगतीतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. केवळ २ रात्रीत हे काम पूर्ण करण्यात आले. वर्दळीच्या रस्त्यावर ४८ मीटर लांबीचा स्टील स्पॅन उचलून त्याच्या निर्धारित जागेवर बसविण्यात आला. अतिरिक्त संसाधनांचा वापर करून मुसळधार पाऊस, रस्त्यावरील सततची वाहतूक आणि मर्यादित जागा आशा कठीण परिस्थितीत हे काम सुरळीत पार पाडण्यात आले, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.
हा स्पॅन लॉन्च झाल्याने आता माजीवाडा आणि कासारवडवली दरम्यानचे सर्व विशेष स्टील स्पॅन बसवण्याचे काम पूर्ण झाले असून यामुळे पहिल्या टप्प्याचे काम वेळेत पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा स्पॅन जलद वाहतुकीचे सुरुळीत प्रवासाचे स्वप्न साकार करणार आहे. मेट्रो लाईन ४ (वडाळा ते कासारवडवली) आता ८४.५% पूर्ण झाले आहे असेही माहिती देताना एमएमआरडीएने दिले आहे.
स्पॅनचा तपशील
- लांबी: ४८ मीटर
- उंची: १४ मीटर, वजन: ३२५ टन
- ४ भव्य स्टील गर्डर वापरून बांधलेले
वापरण्यात आलेले संसाधने
-७०० मेट्रिक टन आणि ५५० टन क्षमतेचे क्रेन्स
-५०० टन आणि ८० टन क्षमतेचे राखीव क्रेन्स
-१०० हुन अधिक अभियंते, कामगार आणि सुरक्षा कर्मचारी
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.