कर्णधारपदासाठी रोहित शर्माला दुसरा पर्याय शोधा - बीसीसीआय
13-Jan-2025
Total Views | 32
मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाने शनिवारी ११ जानेवारी २०२५ रोजी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. ही बैठक मुंबईमधील एका हॉटेलमध्ये झाली असून यासाठी बीसीसीआयचे अधिकारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा आणि निवडकर्ते अजित आगरकर हे देखील उपस्थित होत. यावेळी टीम इंडियाच्या खेळावर आणि येणाऱ्या भवितव्यावर विशेष म्हणजे कर्णधारपदावर चर्चा सत्र झाले.
या प्रकरणी प्रसारमाध्यमानुसार, रोहित शर्मासोबत बीसीसीआयच्या एका बैठकीत कर्णधारपदाबाबत चर्चा झाली. यामध्ये रोहित शर्मा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत कर्णधारपद सांभाळणार असल्याचे सांगितले आहे. तोवर बीसीसीआयने त्याच्या बदल्यात कर्णधारपदासाठी इतर पर्यायायाची शोधमोहिम सुरू केली आहे. मात्र जोवर कोणी कर्णधार मिळत नाही तोवर रोहित शर्माच कर्णधार असेल अशी माहिती सांगण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच रोहित आणि विराट हे दोघेही फलंदाज म्हणावी अशी कामगिरी करू शकले नाहीत. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत म्हणावी अशी कामगिरी करू शकले नसल्याचे सांगण्यात येत आहे. रोहित शर्माला सिडीन कसोटीपूर्वी निवृत्ती घ्यायची होती, असे एका अहवालाने माहिती दिली होती. मात्र ऐनवेळी त्याने आपला निर्णय बदलला. परंतु सध्याच्या सुरू असलेल्या खराब कामगिरीमुळे त्याने संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता.
शनिवारी बीसीसीआयच्या बैठकीत, त्याच्या कर्णधारपदावर आणि टीम इंडियाच्या आगामी कर्णधारपदावर पुन्हा चर्चा करण्यात आली होती. ज्याच रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, बीसीसीआयने रोहित शर्माऐवजी दुसरा पर्याय शोधावा असा आदेश दिला आहे. रोहित शर्माने टी२० मधून निवृत्ती घेतली आहे. त्यांची कसोटी कारकिर्दही संपुष्टात आली आहे.
तसेच बीसीसीआयच्या बैठकीत टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह पुढचा कर्णधार असणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र बुमराहही दुखापतग्रस्त असतो. त्याने मागील पाच कसोटी सामन्याची धुरा एकट्याच्या खांद्यावर पेलली होती. पण शेवटच्या डावांत चतो गोलंदाजी करू शकला नाही. नुकत्याच झालेल्या इंग्लडविरोधातील टी-२० मालिकेमध्ये स्थान मिळाले नाही.