"जेव्हा जेव्हा गुन्हेगारांना शिक्षा झाली तेव्हा काँग्रेसला..."; भाजपचा घणाघात

    25-Sep-2024
Total Views | 60
 
Keshav Upadhye
 
मुंबई : जेव्हा जेव्हा गुन्हेगारांना शिक्षा झाली तेव्हा काँग्रेसला पोटशूळ उठला आहे, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी केला. बदलापूर प्ररणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटवर विरोधकांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच मविआ का हाथ, गुनहागरों के साथ, असेही ते म्हणाले.
 
 
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "बदलापूरमध्ये घडलेल्या संतापजनक प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र खवळला होता. त्या गुन्हेगाराला तेवढीच मोठी शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते आणि त्याला ती शिक्षा मिळाली सुद्धा. परंतू, इकडे मविआने या घटनेचादेखील राजकारणासाठी वापर करायला सुरुवात केली. आज विरोधी पक्षाने लगेच गळे काढायला सुरुवात केली. कालपर्यंत ज्या अक्षय शिंदेला फाशी व्हावी, गुन्ह्याला शिक्षा व्हावी म्हणून मविआतील सर्व नेते गळे काढत होते त्याच मविआतील पक्षांना आज त्याच शिंदेचा पुळका आला आहे."
 
हे वाचलंत का? -  "हिंमत असेल तर उद्या सकाळची पत्रकार परिषद..."; नितेश राणेंचं राऊतांना थेट आव्हान
 
"पण हे काही नवीन नाही. ज्या ज्या वेळी गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे काँग्रेसला पोटशूळ उठला आहे. दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीनंतर, तिथले फोटो बघून मॅडम ढसाढसा रडल्या होत्या, त्यांना रात्रभर झोप आली नव्हती. महाराष्ट्रात इशरत जहाँच्या केसमध्येसुद्धा काँग्रेसला फार वाईट वाटलं होतं. शरद पवार गटाच्या नेत्यांनी तिच्या घरी जाऊन मदत दिली होती. आता बदलापूरच्यावेळी तेच दिसतंय. यात दुर्दैव हेच की, आता त्यांच्या जोडीला उबाठासुध्दा जाऊन बसला आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी पोलिसांचं कौतुक केल असत. पण मतांच्या राजकारणात अडकलेले उध्दव ठाकरे आता सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे मविआ का हाथ सिर्फ और सिर्फ गुनहागरों के साथ हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे," अशी टीका त्यांनी केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121