‘तेजस एमके-२’ पहिल्या उड्डाणासाठी सज्ज भारतीय हवाई दलाची ताकद वाढलीपुढील वर्षी ताफ्यात दाखल होणार

    16-Sep-2024
Total Views | 75

Tejas MK-2
 
नवी दिल्ली : स्वदेशी आधुनिक लढाऊ विमान ‘एलसीए तेजस मार्क-२’ (Tejas MK-2) हे २०२५ मध्ये पहिले उड्डाण करण्याची शक्यता आहे. ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’ने (एडीए) राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी पाचव्या पिढीतील ‘एएमसीए तेजस मार्क-२’ या विमानांचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. भारतीय हवाई दलाने २०३५ सालापर्यंत हे स्वदेशी आणि आधुनिक लढाऊ विमान आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, २०४० सालापर्यंत स्वदेशी पाचव्या पिढीचे विमान ‘एएमसीए’ आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे लक्ष्य आहे.
 
२०४० सालापर्यंत हवाई दलात समाविष्ट होणार
 
हे विमान ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे तंत्र आणि धातू वापरण्यात आले आहेत. तसेच, ५.५ पिढीचे लढाऊ विमान असेल. २०४० सालापर्यंत भारतीय हवाई दलात त्याचा समावेश करण्याचे आमचे ध्येय आहे. दोन इंजिन असलेले हे बहुउद्देशीय विमान असणार आहे.
 
ताशी २,३८५ किलोमीटरचा वेग
 
‘एलसीए मार्क-२’ या लढाऊ विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अविश्वसनीय वेग आहे. हे विमान हवेत २ हजार, ३८५ किमी प्रतितास वेगाने धावू शकते, ज्यामुळे ते जगातील सर्वात वेगवान लढाऊ विमानांपैकी एक बनले आहे. त्याचे एकूण उड्डाण अंतर २ हजार, ५०० किमी आहे, तर युद्धाभ्यास करताना ते १ हजार, ५०० किमीपर्यंतचे अंतर पार करू शकते. याशिवाय, हे विमान ५६ हजार, ७५८ फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121