सेमीकंडक्टर हा डिजिटल युगाचा आधार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    11-Sep-2024
Total Views | 28
pm narendra modi on semiconductor


नवी दिल्ली :   
सेमीकंडक्टर हा डिजिटल युगाचा आधार आहे.वैविध्यपूर्ण अशा सेमीकंडक्टर पुरवठा साखळीमध्ये एक विश्वासार्ह भागीदार बनण्याची क्षमता भारतात असल्याचे सेमिकंडक्टर एक्झिक्युटिव्हजच्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लोकशाही आणि तंत्रज्ञान हे एकत्रितपणे मानवतेचे हित सुनिश्चित करतील यावर भर देताना केंद्र सरकार एक भविष्यसूचक आणि स्थिर धोरणाचा मार्ग निश्चित करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

ते म्हणाले, आगामी काळ हा तंत्रज्ञान केंद्रित असेल आणि सेमीकंडक्टर हा डिजिटल युगाचा आधार असेल. तसेच ते दिवस दूर नसून सेमीकंडक्टर उद्योग हा आपल्या मूलभूत गरजांचा देखील आधारस्तंभ असेल, असेही पंतप्रधान म्हणाले. लोकशाही आणि तंत्रज्ञान हे एकत्रितपणे मानवतेचे हित सुनिश्चित करतील आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक स्तरावरील जबाबदारीचे भान ठेवून भारत आपले मार्गक्रमण करत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
 
देशातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उद्योगांना पोषक वातावरणाचे कौतुक केले आणि सेमीकंडक्टर उद्योगाचा केंद्रबिंदू भारताकडे सरकत असल्याचे गौरवोद्गार सीईओंनी काढले. व्यवसायासाठी अनुकूल असलेल्या वातावरणावर विश्वास व्यक्त करताना भारत हे गुंतवणुकीचे स्थान आहे यावर उद्योगांमध्ये एकमत आहे, असेही सेमीकंडक्टर क्षेत्रातील सीईओ यांनी सांगितले. भारतात सध्या उपलब्ध असलेल्या अपरिमित संधी यापूर्वी दृष्टोत्पत्तीस पडत नसल्याचेही सीईओ म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121