मुंबई : यश मिळवणं जितकं कठिण असतं त्याहूनही ते टिकवणं फार कठिण आणि जबाबदारीचं काम असतं. हिंदी चित्रपटसृष्टीमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलांनी या क्षेत्रात स्वत:च नशीब आजमावलं. काहींना लोकप्रियता मिळाली पण काहींच्या पदरी अपयश आलं. गेली अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि वयाच्या ८०व्या वर्षीही त्यांचा दबदबा कायम आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अभिषेक बच्चन याने अभिनयाचा प्रवास सुरु केला खरा पण सुरुवातीला त्याच्या अभिनयाची तुलना वारंवार वडिलांसोबत केल्यामुळे त्याला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. पण तुम्हाला माहित आहे का या वडिल-मुलाचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये नोंदवले आहे.
२००९ साली ‘पा’ नावाचा चित्रपट आला होता. आर. बाल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘पा’ चित्रपटाची खासियत म्हणजे यात अमिताभ बच्चन मुलाच्या भूमिकेत आणि अभिषेक बच्चन वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. साकारली होती. खरं तर पहिल्यांदाच खऱ्या जीवनातील वडिल-मुलाने ही अशी भूमिका साकारली होती. आणि यामुळेच अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या बापलेकाच्या नावाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये करण्यात आली होती.‘पा’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी १२ वर्षांच्या ऑरो नावाच्या मुलाची भूमिका निभावली होती. आणि हा ऑरो प्रोजेरिया नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित होता. या आजारात कमी वयात मुलांमध्ये वृद्धपणाची लक्षणं दिसतात आणि त्या मुलांचे जीवन यात दाखवण्यात आळे होते.
दरम्यान, याआधीही अभिषेक बच्चन यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये नोंद केली गेली आहे. ‘दिल्ली ६’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान १२ तासांत अनेक शहरांमध्ये फिरल्यामुळे अभिषेकचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आलं आहे. तसेच, अमिताभ बच्चन यांनी १९ प्रसिद्ध गायकांबरोबर ‘हनुमान चालीसा’ गात इतिहास रचला होता.