मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख राज्यात ओढावलेल्या पुरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आधी ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र आता प्रदर्शनाची नवी तारीख जाहिर करण्यात आली आहे.
धर्मवीर २ चित्रपटाच्या टीमने नव्या प्रदर्शनाची तारीख सोशल मिडियावर एका पोस्टद्वारे जाहीर केली आहे. " ‘धर्मवीर- २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट...’ २७ सप्टेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !" असं कॅप्शन देत निर्मात्यांनी रिलीज डेट सांगितली आहे.
दरम्यान, प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित २०२२ साली आलेल्या धर्मवीर १ : मुक्कास पोस्ट ठाणे या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. यात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांने साकारील आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत क्षितीज दाते दिसत आहे.