मुंबई : माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व) येथील 33.15 हेक्टर जमिनीवर व्यापलेल्या झोपडपट्टीमधील झोपडीधारकांचे पुनर्वसन ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) आणि ‘झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण’ (एसआरए) यांच्या संयुक्त भागीदारी तत्वावर करण्यास शासनमान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. दरम्यान, तत्पूर्वीच या प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी दोन्ही प्राधिकरणांनी आपली तयारी सुरू केली होती.
दरम्यान, बुधवार, दि. 31 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या शासननिर्णयात ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’ या दोघांकडून करण्यात येणार्या कामाचा तपशील देण्यात आला. या दोन्ही प्राधिकरणांकडे या प्रकल्पांची जबाबदारी असेल. दरम्यान, यापूर्वीच ‘एसआरए’च्या माध्यमातून प्रकल्पांसाठी झोपडीधारकांच्या पात्रतानिश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, ‘एमएमआरडीए’ने प्रकल्पव्यवस्थापनासाठी निविदाप्रक्रिया जारी केली आहे.