कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण घडतील!

आमदार अतुल भातखळकर यांचा विश्वास, मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

    31-Jul-2024
Total Views |
Atul Bhatkhalkar On Skill Development

मुंबई :
कांदिवली पूर्व विधानसभेत हनुमाननगरमधील राष्ट्रमाता जिजाऊ महिला आधार भवन येथे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे अकाउंट असिस्टंट, टॅली ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग असे कोर्स शिकवले जाणार आहेत. त्यामुळे या कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण तयार होतील, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

ते म्हणाले, गेल्या १० वर्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ज्या प्रमुख बाबींवर भर देण्यात आले, त्यात कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. जे मनुष्यबळ कामासाठी उपलब्ध आहे, ते रोजगारक्षम असायला हवे. त्यामुळेच हे प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे.या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे नवे कोर्स सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय मालाड, पोयसर भागात सुद्धा असे कोर्स सुरु करण्यात येणार आहेत. ज्या कोर्ससाठी साधारण २५ ते ४० हजार रुपये खर्च येतो तोच कोर्स आम्ही मोफत शिकवत आहोत, अशी माहिती ही भातखळकरांनी दिली. यावेळी कोसिया संस्थेचे निनाद जयवंत, आर. सी. रॉय यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121