“ज्यावेळी प्रसाद दादाला आनंद दिघेंच्या वेशात पाहिलं तेव्हा मी...”, क्षितीजने सांगितला अनुभव

    22-Jul-2024
Total Views | 53

kshitish date  
 
 
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर १ : मुक्कास पोस्ट ठाणे या चित्रपटानंतर आता दुसरा भाग धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ९ ऑगस्ट रोजी देशभरात मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यावेळी चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीज दाते याने पहिल्यांदा प्रसाद ओक यांना आनंद दिघेंच्या वेशात पाहिल्यावरचा अनुभव सांगितला आहे.
 
क्षितीज दाते म्हणाला की “प्रविण तरडे यांच्यासोबत काम केलेला हा माझा पाचवा चित्रपट आहे. आम्ही नेहमी असं म्हणतो की प्रविण तरडे यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे. प्रेक्षकाभिमुख कलाकृती कशी तयार करावी याची पुर्ण जाण त्यांना असल्यामुळे धर्मवीर १ ला देखील उदंड प्रतिसाद मिळाला”. पुढे बोलताना क्षितीश म्हणाला की, चरित्रात्मक चित्रपटांच्या बाबतील फोटोत किंवा समोरासमोर पाहिलेली व्यक्ती कुठलातरी नट साकारत असतो. कलाकार असल्यामुळे आपल्याला माहित असतं की कोणत्याही भूमिकेत किंवा वेशभूषेत आपल्यासोबत काम करणारा कलाकार हा आपला सहकलाकारच आहे याची आपल्याला माहिती असते. पण धर्मवीर १ च्या वेळी जेव्हा पहिल्यांदा प्रसाद ओक माझ्यासमोर आनंद दिघे यांच्या वेशात समोर आले तो क्षण मी आजन्म विसरु शकणार नाही. कारण, सहकलाकार आणि त्यातही या क्षेत्रात ते माझ्यापेक्षा वरिष्ठ कलाकार असल्यामुळे मी आनंद दिघेंच्या भूमिकेत ते असल्यामुळे आपसुकच अधिक अदबीने वागत होतो. इतकी त्यांच्या अभिनयाची जादू माझ्यावर झाली होती”.
 
दरम्यान, ‘धर्मवीर : २’ चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास ९ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, क्षितीज दाते यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावल्या आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121