मुंबई, दि.२ :प्रतिनिधी 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' या मध्य रेल्वेच्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत आता दादर रेल्वेस्थानकाबाहेरील 'दादर दरबार' हे उपहारगृह रेल्वे प्रवाशांना उत्तम जेवणाचा आनंद देण्यासाठी सज्ज झाले आहे. मध्य रेल्वेने जुन्या रेल्वे डब्यांना उपहारगृहामध्ये रूपांतर करण्याची ही संकल्पना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. याच पार्श्वभूमीवर बँड वॅगनमध्ये सामील होणारे नवीनतम रेस्टॉरंट ऑन व्हील्स हे "दादर दरबार" आहे जे मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर उघडण्यात आले आहे.
दादर पूर्व स्थानकाबाहेर उभारण्यात आलेले "दादर दरबार" हे ७२ जणांना सामावून घेण्याइतके प्रशस्त आहे. याचसोबत, मध्य रेल्वेवरील इतर रेस्टॉरंट ऑन व्हील्सच्या तुलनेत सर्वाधिक क्षमतेचे आहे. नावाप्रमाणेच, "दादर दरबार" च्या आतील भागात एक प्रासादिक वातावरण आहे. इथे किरकोळ दरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने "दादर दरबार" मेसर्स युनिक एंटरप्रायझेसला ५ वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक रु.५८.११ लाख परवाना शुल्कासह ई-लिलावाद्वारे चालविण्यास देण्यात आले आहे.
या उपक्रमातून मध्य रेल्वेला दरवर्षी रु. १५.५९ लाख मिळतील. सेवेतून काढून टाकलेला रेल्वे डबा परवानाधारकाने मुंबईतील एका प्रसिद्ध वास्तुविशारदाकडून डिझाइन केलेल्या अप्रतिम रेस्टॉरंटमध्ये बदलला आहे. असेच रेस्टॉरंट ऑन व्हील्स सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे, अमरावती आणि अकोला येथे कार्यरत आहेत. हे रेस्टॉरंट ऑन व्हील्स थीम हे प्रवासी-अनुकूल उपक्रमांचे उत्कृष्ट उदाहरण असून या महसूल निर्मितीच्या नवीन कल्पनेला चालना देणारे आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.