रशियातील मॅास्कोजवळ विमान कोसळले ; तिन्ही क्रू सदस्यांचा मृत्यु
13-Jul-2024
Total Views | 46
नवी दिल्ली:रशियाच्या मॅास्को येथे एक सुखोई सुपरजेट- १०० प्रवासी विमान कोसळले आहे. त्यात तिघाचा मृत्यु झाला . शुक्रवारी रशियन प्रवाशी विमान प्रवाशांशिवाय उड्डान करत असताना क्रॅश झाले. तर हे सुखोई सुपरजेट १०० हे विमान मॅास्को प्रदेशात कोसळले. या विमानात प्रवासादरम्यान एकही प्रवासी नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुरुस्तीनंतर हे विमान मॅास्कोच्या वनुकोव्हे या विमानतळावर जात होते. त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली आणि विमानाचे दोन तुकडे झाले.
तर या दुर्घटनेचे कारण काय आहे हे शोधण्यासाठी तपास समिती नेमण्यात आली आहे. मे २०१९ मध्ये मॅास्कोच्या शेरेमेत्येवो विमानतळावर आणखी एक सुपरजेट क्रॅश झाले होते.त्यात ४१ जम ठार झाले होते. टेकऑफनंतर त्या विमानाला विजेचा धक्का बसला व ते विमान पडले त्यानंतर इमर्जंसी लँडिंग करण्यात आले. तर तपासाच वैमानिकाला दोष देण्यात आला त्याने असा निष्कर्ष काढला जास्त वेगाने विमान जळत नसल्याने इंधनासह लँड केले.परिणामी खडबडीत टचडाउन होऊन आग लागली.