शरद पवार गटाला 'पिपाणी' चिन्हाचा फटका! निवडणूक आयोगाला पत्र
24-Jun-2024
Total Views | 43
मुंबई : लोकसभा निवडणूकीत आम्हाला पिपाणी चिन्हाचा फटका बसला आहे, असे सांगत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देण्यात आले होते. तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले होते. परंतू, लोकसभा निवडणूकीत चिन्ह काही भागातील उमेदवारांना तुतारी या चिन्हासारखं दिसणारं पिपाणी हे देण्यात आलं होतं. दरम्यान, या सगळ्याचा आम्हाला लोकसभेत मोठा फटका बसला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, अशा मागणीचे पत्र शरद पवार गटाने आयोगाला लिहिले आहेत. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.