Kartik Poornima : कार्तिक पौर्णिमेनिमित्त अस्तिका समाजाद्वारे कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आवाहन

    06-Nov-2025   
Total Views |

मुंबई : (Kartik Poornima) अस्तिका समाज भगवान कोचु गुरुवायूर कृष्ण मंदिर हे माटुंगा पूर्व, येथील १०२ वर्षे जुने मंदिर आहे, जिथे गुरुवायूर कृष्ण मंदिर, गुरुवायूर, केरळ ह्यांची पारंपरिक पूजा/विधी चालत आली आहे. विश्वस्तांतर्फे भगवान कार्तिक स्वामींच्या भक्तांना कळविण्यात येत आहे की, कार्तिक स्वामींच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी दि. ५ नोव्हेंबर २०२५ पहाटे ५.०० ते दुपारी १.०० पर्यंत व दुपारी २.०० ते रात्रौ ९.०० पर्यंत खुले राहील. कृपया या वेळेतच भाविकांनी भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन आस्तिका समाज मंदिराच्या विश्वस्तांना उपकृत करावे अशी विनंती करण्यात येत आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक