महाएमटीबी शनिवार विशेष: अशी गुंतवणूक केल्यास श्रीमंत व्हाल !

    22-Jun-2024
Total Views | 39

Investment
 
मोहित सोमण
 
व्यस्त माणसाला गुंतवणूक करायची असल्यास म्युच्युअल फंड शिवाय दुसरा संयुक्तिक पर्याय नाही. धकाधकीच्या जीवनात अनेकदा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अनेकदा योजनाबद्ध गुंतवणूक नसल्यास अनेकदा महत्वाच्या अथवा संकटाच्या प्रसंगात निधी कमी पडतो व पंचाईत येते. मात्र कालानुरूप गुंतवणूक कशी करावी याची योजना आखल्यास पुढील गोष्टी सोप्या होतात त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे म्युच्युअल फंड......
 
अनेकदा इंट्रा डे अथवा शेअर बाजारातील रोजच्या रोज व्यवहारात नफा नुकसान होत असते. अनेकदा यामुळेच नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यास कठीण जाते.मात्र नोकरदार वर्गाला वेळेच्या अभावी इंट्रा डे ट्रेडिंग करणे सोयीस्कर नाही.किंबहुना ते अधिक धोकादायक आहे. मग सुखरुप व योग्य गुंतवणूक कुठली ? तर ती आहे म्युच्युअल फंड.
 
एखाद्या पोर्टफोलिओ मॅनेजरकडून गुंतवणूक केल्यास एक ठराविक वेळेत संतुलित परतावा मिळू शकतो. तसेच गुंतवणूकदारां ना भविष्यकाळातील तरतूद म्हणून मोठ्या निश्चित काळासाठी गुंतवणूक करणे म्युच्युअल फंडात शक्य होते. विविध कालावधीत विविध म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास त्याचा परतावा मोठ्या प्रमाणात मिळतो. तसेच बाजारातील विविध उत्पादनात गुंतव णूक केल्यास स्वतः ला विविध समभाग ट्रॅकिंग करत विकत घेण्याचीही अथवा विकत बसण्याची गरज नाही. वेळोवेळी विविध घटनेचा परिणाम बाजारातील शेअर बाजारात होत असताना त्यातील गुंतवणूक फायनांशियल सल्लागाराकडे केल्यास तो आप ल्या गुंतवणूकीची तरतूद विविध आर्थिक उत्पादनात करतो. बँकेच्या वर्षाच्या व्याजाने जितका परतावा मिळत नाही तितका परतावा म्युच्युअल फंड सहजतेने देऊ शकतो.
 
इक्विटीतील गुंतवणूकुतील परतावा मोठा असला तरी धोकाही तितकाच असतो. नोकरपेशा माणसांसाठी ती आर्थिक जोखीम ठरू शकते. त्या उलट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास त्याकडे मुदत संपेपर्यंत बघायची गरज नसते. एसआयपी (Syste matic Investment Plan) मध्ये पण गुंतवणूक केल्यास मोठा परतावा शक्य आहे. जितकी शक्य असेल तितकी ठराविक रक्कम दर महिना भरण्यास वृत्तानुसार, अनेक एसआयपी (SIP) ने १२० टक्क्यांनीही परतावा दिला आहे. मुख्यतः बाजारात एसआयपी गुंतवणूक जोखमीची नसल्याने अनेकदा प्रत्येक घटकातून निश्चित परतावा मिळणे सोपे जाते. एसआयपी गुंतवणूकीत विविध आर्थिक पातळ्यांवर ही गुंतवणूक पोर्टफोलिओ मॅनेजरकडून करण्यात येते. ज्यामध्ये विविध बाँड, इक्विटी फंड, म्युच्युअल फंड, व इतर अनेक इन्स्ट्रुमेंटचा समावेश होतो. यामध्ये संतुलित गुंतवणूकीमुळे गुंतवणूक विभागल्याने जोखीम देखील कमी होते.
 
तसेच इक्विटी लिंक सेविंग स्कीममध्येही गुंतवणूक करू शकता ज्यामध्ये तुम्ही आपला कर वाचवू शकता. ही गुंतवणूक ८० C मध्ये करमुक्त असल्याने त्याचा फायदा तुम्हाला मिळतो.याशिवाय तुम्ही क्षेत्रीय विशेष म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात.क्षेत्रीय विशेष म्युच्युअल फंडात तुमची रिस्क घेण्याची तयारी असेल तर लार्ज, मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये विशेष म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. मोठ्या समभागांच्या म्हणजेच लार्ज कॅप समभागात गुंतवणूकीत जोखीम अधिक असते मात्र यात परतावा देखील अधिक मिळू शकतो. त्यामानाने मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये परतावा कमी परंतु जोखीमही कमी असु शकते.
 
दुसरीकडे लार्जकॅप, मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये तुम्ही एकत्रपणे संतुलित गुंतवणूक करू शकता ज्यामध्ये तुम्हाला जोखीम संतुलित ठेवण्याची संधी मिळते. याखेरीज तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड, ग्रीन म्युच्युअल फंड अशा विविध हेतूने बनवलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास त्यांचा परतावा आपापल्या गरजेप्रमाणे मिळू शकतो. एसआयपी गुंतवणूकही हे शक्य होऊ शकते.
 
कुठलीही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. निश्चितच तुम्ही आपल्या बचतीचे योग्य नियोजन केल्यास तुम्हाला तुमच्या भविष्याची तरतूद सहजपणे करता येईल याखेरीज तुम्ही आगामी काळात विविध पातळ्यांवर गुंतवणूक करू शकणार आहात. परंतु पूर्णपणे एका योजनेवर अवलंबून न राहता विविध योजनेत योग्य प्रमाणात गुंतवणूक केल्यास तुमच्या गुंतवणूकीची जोखीम तर कमी होतेच परंतु परतावा ही अ़धिक जास्त व संतुलित व सुरक्षित पद्धतीने मिळू शकतो. गुंतवणूकीचे अनेक मार्ग परंतु आपल्या गरजेनुसार, आपल्या उद्दिष्टाने, सोयीप्रमाणे, बाजारातील परिस्थिती, आपले उत्पन्न अशा विविध पातळ्यांवर विचार करून गुंतवणूक केल्यास तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे मात्र नक्की.
 
(टीप - हे व्यक्तिगत विचार असून या मताशी संस्था सहमत असेल असे नाही. हे केवळ व्यक्तिगत विचार असुन कुठल्याही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121