जम्मू – काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक, राज्याचा दर्जाही मिळणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

    20-Jun-2024
Total Views | 36
jammu and kashmir election


नवी दिल्ली :       जम्मू काश्मीरमध्ये आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे जम्मू – काश्मीरलाही लवकरच पुन्हा राज्याचा दर्जा प्राप्त होईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून दोन दिवसीय जम्मू – काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी श्रीनगरमधील शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात ‘युवा सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ या कार्यक्रमास संबोधित केले.

यावेळी ते म्हणाले, तो दिवसही लवकरच येईल जेव्हा जम्मू-काश्मीर राज्य म्हणून आपले भविष्य उज्वल करेल. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. लवकरच येथील जनता आपले सरकार निवडून देईल. सर्वांना विभाजित करणारी कलम ३७० ची भिंत पडली आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय राज्यघटना खऱ्या अर्थाने लागू झाली आहे आणि ज्यांनी आजपर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही तेच दोषी आहेत, असेही ते म्हणाले.

अटलजींनी दिलेली इन्सानियत, जम्हुरियत आणि काश्मिरियतच्या संदेशास आज पूर्ण होताना जग बघत आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जनादेशाचा मोठा संदेश स्थिरतेचा आहे. काश्मीरमध्ये सतत विकास योजनांवर काम सुरू आहे. अनेक ठिकाणी महामार्ग बांधले जात आहेत. काश्मीर रेल्वेने जोडले जात आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये येणारा हा बदल गेल्या १० वर्षातील आमच्या सरकारच्या प्रयत्नांचे परिणाम आहे. आज जम्मू आणि काश्मीर हे स्टार्ट-अप, कौशल्य विकास आणि खेळांचे मोठे केंद्र बनत आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.



 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121