मुंबई : अभिनेता रणबीर कपूर याची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट अॅनिमल याने २०२३ मध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड मोडित काढत प्रेक्षकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया मिळवल्या. ॲनिमलच्या यशानंतर अॅनिमल पार्कची घोषणा निर्माते आणि दिग्दर्शकांनी केली होती. या चित्रपटात अभिनेता सौरभ सचदेवा याचीही महत्त्वाची भूमिका होती. आणि त्याने या चित्रपटाबद्दल माहिती देत म्हटले आहे की, “ॲनिमल पार्क रिलीज व्हायला अजून वेळ लागू शकतो”.
सौरभ याने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “रणबीर कपूरच्या ॲनिमल पार्कच्या निर्मितीला उशीर होऊ शकतो. अभिनेता सध्या रामायणच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो म्हणाला की, या विषयावर निर्माते आणि दिग्दर्शकाशी अद्याप चर्चा झालेली नाही. संदीप रेड्डी वांगा म्हणाले की, अजून वेळ आहे, मी आणखी एक चित्रपट (प्रभास की स्पिरिट) बनवत आहे आणि रणबीर रामायण करत आहे, त्यामुळे खूप वेळ लागणार आहे”.
पुढे तो असं देखील म्हणाला की, “चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, ती कदाचित २०२६ किंवा २०२७ मध्येही असू शकते. ही कथा लिहिली गेली आहे की अजूनही त्याच्या ढोबळ मांडणीत आहे हे मला अद्याप माहित नाही”. त्यामुळे अॅनिमल पार्क साठी प्रेक्षकांना बरीच प्रतिज्ञा करावी लागणार आहे.