‘खलनायक २’मध्ये बल्लू बलरामच्या भूमिकेत दिसणार ‘हा' अभिनेता, सुभाष घै यांचा खुलासा

    18-Apr-2024
Total Views | 150
सुभाष घै दिग्दर्शित 'खलनायक २' चित्रपटाच्या कथेवर काम सुरु असल्याची माहिती मिळत असून लवकरच चित्रपटाबद्दल घोषणा करणार असे सांगितले जात आहे.
 

khalnayak 2 
 
मुंबई : १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ (Khalnayak 2) या चित्रपटाने अभिनेता संजय दत्त याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. याशिवाय माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी उचलून धरले. ९० च्या दशकात ‘खलनायक’ हा सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक सुभाष घै लवकरच ‘खलनायक २’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये खलनायक चित्रपटाची ३० वर्ष साजरी करताना त्यांनी ही घोषणा केली होती. मात्र, ‘खलनायक’ आणि संजय दत्त हे अतुट समीकरण असून ‘खलनायक २’ (Khalnayak 2) यात संजय दत्तची जागा अन्य कोणता कलाकार घेणार की नाही याचे उत्तर सुभाष घै यांनी दिले आहे.
 
दरम्यान, खलनायक २ मध्ये संजय दत्तच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी अनेक कलाकरांची नावे समोर आली होती. यात रणवीर सिंग, यश, रणबीर कपूर आणि अल्लू अर्जून या आघाडीच्या कलाकारांच्या नावांचा समावेश होता. मात्र, यावर आता सुभाष घै यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
 
टाईम्स ऑफ इंडियाशी बातचीत करताना सुभाष घै म्हणाले की, “ ‘खलनायक २’ मध्ये मी बल्लू बलरामच्या भूमिकेसाठी कोणताही दुसरा कलाकार शोधत नाही आहे. तर आता मी बल्लूच्या विरुद्ध एका कलाकाराच्या शोधात आहे. पण मी एक सांगू इच्छितो की खलनायक २ मध्ये बल्लू बलराम संजय दत्तच साकारणार आहे. त्यामुळे खलनायकमध्ये संजय दत्त असणार हे पक्क झालं असून दुसरा कलाकार कोण असणार याची मात्र उत्सुकता लागली आहे.
 
'खलनायक' हा १९९३ साली सुभाष घई यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला चित्रपट यात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत होता. तर माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफही महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटाची खासियत म्हणजे १९९३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला होता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121