'अ‍ॅनिमल' नंतर संदीप रेड्डी वांगा मायकल जॅक्सनवर चित्रपट बनवणार?

    10-Apr-2024
Total Views | 35
'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या यशानंतर आता दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा चरित्रपट करणार अशी चर्चा जोर धरु लागली आहे.
 

sandeep  
 
मुंबई : २०२३ या वर्षातील सुपरहिट चित्रपट म्हणजे 'अ‍ॅनिमल'. दिग्दर्शक संदीप वांगा (Michael Jackson) यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादावर धुमाकूळ घातला. अभिनेता रणबीर कपूर याची वेगळीच बाजू त्याच्या चाहत्यांना दिसली. या चित्रपटाच्या यशानंतर संदीप यांनी जगप्रसिद्ध पॉप स्टार - गायक मायकल जॅक्सनवर (Michael Jackson) चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
संदीप रेड्डी वांगा यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “मायकल जॅक्सनवर बायोपिक बनवण्याची इच्छा आहे. कधी कधी मी मायकल जॅक्सनवर बायोपिक बनवण्याचा विचार करतो. मला मायकल जॅक्सनच्या बायोपिकचे दिग्दर्शन करायचे आहे, पण प्रश्न असा आहे की त्याची भूमिका कोण करणार? त्याच्या भूमिकेत कोण अभिनेता असेल? एखादा योग्य अभिनेता दिसला तर बायोपीक इंग्रजीत बनवून मी हॉलिवूडमध्येही तो रिलीज करु शकतो."
 
पुढे ते म्हणाले की, "मायकल जॅक्सनने बालपणापासून ते शालेय शिक्षणापर्यंत त्याच्या त्वचेचा रंग कसा बदलला आणि तो कसा जगला असं त्याचं संपुर्ण आयुष्य खूपच मनोरंजक आहे. मायकलचा जीवन प्रवास खूपच विलक्षण आहे. पण त्याला पडद्यावर साकारण्यासाठी योग्य अभिनेता कोण असेल? हा मोठा प्रश्न आहे. त्याचा बायोपिक येणं हे माझ्यासाठी स्वप्न असेल." त्यामुळे कदाचित योग्य कलाकार सापडला तर संदीप मायकल जॅक्सनवरील चित्रपट लवकरच भेटीला आणतील असे म्हणण्यास हरकत नाही.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121