एमएमआरडीए प्रकल्पांचे पुनरावलोकन होणार!

    23-Mar-2024
Total Views |
MMRDA Projects Review



मुंबई :   वाहतूक सुविधा वाढविण्याच्या उद्देशाने एमएमआर क्षेत्रामध्ये विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या सर्व प्रकल्पांच्या व्यवहार्यता अभ्यास, डीपीआर तयार करण्यासाठी वैयक्तिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे.

मात्र, एमएमआरडीए डीपीआर, वाहतूक सर्वेक्षण, वाहतूक प्रक्षेपण, अलाइनमेंटचे अंतिमीकरण, बिड दस्तऐवज तयार करण्यासाठी पीअर रिव्ह्यूसाठी अतिरिक्त सल्लागार नेमण्याची तयारी एमएमआरडीएने सुरु केली आहे. यासाठी ३४,१७४ कोटींच्या निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित सल्लागार कंपनीला १२ महिन्यात हा रिव्युव्ह पूर्ण करावयचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएने प्रकल्पाच्या गुंतागुंतीच्या स्वरूपामुळे, बोली दस्तऐवज तयार करण्याबरोबरच व्यवहार्यता अभ्यास आणि डीपीआर आणि समीक्षणासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पीअर रिव्ह्यू कन्सल्टंट्सनी काही प्रकल्पांसाठी बोलीची कागदपत्रे आधीच तयार केली आहेत. एमएमआरडीएने पिअर रिव्ह्युव्हसाठी निवडलेल्या प्रकल्पांसाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत.


हे वाचलंत का? - प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा, म्हणाले "शिवसेना आणि वंचितची युती..."


त्यामुळे संबंधित सल्लागार कंपनीला बोलीपूर्व प्रश्नांना उत्तर देणे, परिशिष्ट / शुद्धिपत्रक तयार करणे, बोलीसारच्या पात्रता, तातांत्रिक बोली आणि आर्थिक बोली याबाबतचे मूल्यांकन करून बोलीवर ठरविण्यासाठी शिफारस करणे याबाबत सूचना करावयाच्या आहेत. डीपीआर सल्लागारांनी डीपीआरच्या विविध पैलूंचा अभ्यास करावयाचा आहे. जसे की, विविध सर्वेक्षणे, तपासणी, विश्लेषण, संरेखन निश्चित करणे, बोलीच्या उद्देशासाठी मूलभूत संरचना डिझाइन, अंदाज, कंत्राटदार आणि पीएमसीसाठी बोली दस्तऐवज तयार करणे.

तसेच, या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकरणांमध्ये कायद्याच्या संबंधित न्यायालयात एमएमआरडीएचे प्रतिनिधीत्व करणे, जेव्हा आणि जेव्हा अशी प्रकरणे सल्लागार कराराच्या कालावधीत उद्भवतात तेव्हा एमएमआरडीएच्या निर्देशानुसार, या प्रकल्पाबाबत विविध ठिकाणी होणाऱ्या सर्व बैठकांना उपस्थित राहून एमएमआरडीएच्या निर्देशानुसार इतिवृत्त तयार करणे, संपूर्ण सल्लागार कालावधीसाठी सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रकल्पासाठी विविध मंजुरी मिळविण्यासाठी स्थानिक प्राधिकरणांशी समन्वय साधने ही कामे सल्लागाराला करावी लागणार आहेत.