एसबीआयने पूर्ण माहिती जाहीर केली

मेघा इंजिनिअरिंगने सर्वाधिक देणगी दिली

    22-Mar-2024
Total Views | 737

SBI
 
मुंबई: अखेर एसबीआयने (State Bank of India) ने निवडणूक आयोगाला इलेक्ट्रोल बाँडबद्दल विस्तारीत माहिती दिल्याचे न्यायालयात स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाला मेघा इंजिनिअरिंग व इन्फ्रास्ट्रक्चरने सर्वाधिक देणगी दिल्याचे यात स्पष्ट केले आहे. मेघा इंजिनिअरिंगने ६०० कोटींची या बाँड इन्स्ट्रुमेंटसच्या माध्यमातून देणगी दिली आहे तर क्विक सप्लायचेन मॅनेजमेंट (३७५ कोटी) वेदांता ग्रुप (२३६ कोटी) भारती ग्रुप (२३० कोटी) यांनी दिली आहे. तर काँग्रेसला सर्वाधिक देणगी वेदांता ग्रुप (१२५ कोटी) वेस्टर्न युपी पॉवर ट्रान्समिशन (११० कोटी) एमकेजी एंटरप्राईज (६९ कोटी) व यशोदा ग्रुप (६४ कोटी) इतकी देणगी दिली आहे.
 
न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत एसबीआयने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी दिलेल्या माहितीत सिरियल नंबर नसून अपुरी माहिती होती. परंतु न्यायालयाने संपूर्ण माहिती मागितली असल्याने आता युनिक अल्फाबेटिक नंबर देखील देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्ष ६०६१ कोटी त्यानंतर तृणमूल काँग्रेसला १६१० कोटी रुपये मिळाले असून काँग्रेसला १४२२ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.
 
सर्वाधिक बाँडची खरेदी फ्युचर गेमिंग ग्रुपने केली असल्याचे मागील आठवड्यात स्पष्ट झाले होते.या समुहाने १३६८ कोटींची देणगी दिली असून त्या बाँडचे लाभार्थी (Beneficiary) डीएमके, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस पक्ष, भाजपा इत्यादी पक्षांना मिळाली आहे. क्विक सप्लाय चेनने दुसरा नंबर पटकावला असुन या कंपनीने ३७७ कोटींची देणगी दिली आहे.
 
व्यक्तीसमुहात लक्ष्मीनिवास मित्तल, राहुल भाटिया किरण मजुमदार शॉ, राजेश अग्रवाल यांनी दिली आहे. एसबीआयने यात प्रतिज्ञापत्र दाखल करत 'सर्व माहिती ' दिल्याची स्पष्ट केली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121