राज्यातील १०० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र!

मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ

    12-Mar-2024
Total Views |
Skill Development Centre



मुंबई :  सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.
 
दरम्यान, दि. १३ मार्च २०२४ रोजी राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य विकास केंद्रांचे सूरू करण्यात येणार आहेत. सदर कौशल्य विकास केंद्रांचा उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीने मेघदूत या शासकीय निवासस्थानी सकाळी ११ वाजता संपन्न होईल.



हे वाचलंत का? >>>  'सिद्धार्थ'ला न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहणार! : अभाविप
 
महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापनेसाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. "पारंपारिक महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचे देखील प्रशिक्षण मिळायला हवे. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या युवक युवतींना सक्षम बनवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरु केलेले कौशल्य विकास केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावतील. या मार्फत राज्यात किमान २०,००० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल.

बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन युवकांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमांची निर्मिती देखील केली जाईल. पहिल्या टप्प्यात १०० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु होत आहे. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु करण्याचे ध्येय आम्ही पूर्ण करू!" असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० अंतर्गत जाहिर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून महाविद्यालयामध्ये हे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. युवक युवतींना रोजगारासाठी, त्यांच्या करिअरसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण या माध्यमातून प्रदान करण्यात येणार आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन तलवारः कारगिल युद्धातील भारताची दबावमूलक मुत्सद्देगिरी

ऑपरेशन तलवारः कारगिल युद्धातील भारताची दबावमूलक मुत्सद्देगिरी

कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातून पाकिस्तानला दिलेला स्पष्ट इशारा २६ जुलै रोजी 'कारगिल विजय दिन' साजरा केला जातो या दिवशी आपण कारगिल संघर्षातील आपल्या विजयाचे स्मरण करतो. या लढ्याचे केंद्रबिंदू राहिलेले भारतीय सैन्य आणि त्याच्या पराक्रमाचे नेहमीच कौतुक होते. हा संघर्ष प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (LoC) झाला होता. शत्रूने भारतीय हद्दीत घुसखोरी करून भूभाग व्यापला होता आणि त्याला जमिनीवरच्या कारवायांद्वारे आणि आकाशातून हल्ले करून मागे हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे साहजिकच, या संघर्षाचा मुख्य कथानक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121