रहमान निघाला कसाई! एका वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार
20-Feb-2024
Total Views |
लखनौ : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ५० वर्षीय आरोपीने एका वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोंदू रहमान नावाच्या आरोपीचे वय ५० वर्षे आहे. रहमानला पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर आणणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे.
बलात्काराची ही घटना शनिवारी, दि. १७ फेब्रुवारी २०२४ घडली. बलात्कारानंतर त्याने पीडितेच्या आईलाही शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण बहराइचमधील नानपारा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे शनिवारी पीडितेच्या कुटुंबीयांनी त्यांच्या एका वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
तक्रारीत मुलीच्या आईने सांगितले की, ती आपल्या मुलीसह मोहरीच्या शेतात गेली होती. पीडित मुलगी शेताबाहेर खेळत होती. दरम्यान, शेजारी राहणारा ५० वर्षीय भोंदू रेहमान तेथे आला. भोंदूने मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर मुलीचा आरडाओरडा ऐकून पीडितेची आई तेथे पोहोचली.
पीडितेच्या आईला पाहताच भोंदू रहमानने घटनास्थळावरून पळ काढला. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत होती. या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला रुग्णालयात दाखल केले. बहराइचचे पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांच्या सूचनेवरून मुलीला लखनौला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली एफआयआर नोंदवला. फरार असलेल्या भोंदू रहमानला पोलिसांनी रविवारी दि. १८ फेब्रुवारी २०२४ अटक करण्यात आली. आरोपींचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी जाहीर केले. मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.